नशीब
रात्रीच्या गर्भात काल..
सुंदर स्वप्न अंकुरले होते.
दिसले नाही नीटसे पण...
नक्की नशीब कुजकट हसले होते!
ते म्हणाले असणार....
सुखावुन घे आभासांनी
रात्र तुझी आहे....
उजाडू दे उजाड वास्तव
मग दिवस माझाच आहे!
दोन कवाडं उघडली की...
वास्तव जाळणार आहे तुला
जमलंच तर नको उघडू डोळे..
सत्य काय अन काय चितेच्या ज्वाळा....
नशीबाचे शाप लाभणार....
कवितेच्या हस्ते तुला;
लिहायला बसशील वेगळंच कही....
सुचेल फक्त 'तीच' तुला!
कवितेच्या नावाखाली
नुसती शाई नासणार तू...
पानावरचं उठवणार वादळं
अन् पानावरंच शमवणार तू!
कायमंच हरलायस तू माझ्याशी..
खेळ जमलाच नाही तुला...
नशीबावर हवाला ठेवून
असे डाव लावू नयेत बाळा!
मग मी ही म्हणालो नशीबाला
मानलं साल्या तुला
चांगला खेळ मांडलास तू..
दोरे तुझ्या हातात
अन् माला उडायला सांगतोस तू!
तुझ्या लेखी हारलो असेनही
पण मझा हिशोब सरळ आहे...
गणितात मझ्या सगळा
वजाबाकीचाच तर खेळ आहे!
कसाही असला तरिही
माझा भोग माला मान्य आहे
सुंदर दिवसा साठी माला
उजाड रात्र मान्य आहे!
दुसर्या साठी झिजण्यास
खूप मोठं मन लागतं
चंदन आणि ज्योत होण्यास
माझ्यासारखं जिगर लागतं!
माझ्या वाटा वेगळ्या होत्या
माझे खेळच वेगळे होते..
दोरे होते तुझ्या हातात पण
माझे आकाशच वेगळे होते!
तिच्या सुखासाठी माझे दुःख
नेहमीच मान्य आहे मला
इथेच हरलास तू
अन् कळालंच नही तुला!!!
हे असलं कहितरी लिहीतो सध्या..
एकटाच स्वतःशी बोलतो सध्या...
अशीच कहितरी स्वप्न बघतो...
अन् सकळी स्वतःला हसतो सध्या!
सगळ्यांना हे हास्यच दिसणार आहे
चांगुलपणावरचा अढळ विश्वास दिसणार आहे
रत्री उश्या भिजजवत जागणारा मी फक्त
मझ्यापाशीच राहणार आहे!!!
फक्त मझ्यापाशीच राहणार आहे!!!
-रोहित गुजराथी
रात्रीच्या गर्भात काल..
सुंदर स्वप्न अंकुरले होते.
दिसले नाही नीटसे पण...
नक्की नशीब कुजकट हसले होते!
ते म्हणाले असणार....
सुखावुन घे आभासांनी
रात्र तुझी आहे....
उजाडू दे उजाड वास्तव
मग दिवस माझाच आहे!
दोन कवाडं उघडली की...
वास्तव जाळणार आहे तुला
जमलंच तर नको उघडू डोळे..
सत्य काय अन काय चितेच्या ज्वाळा....
नशीबाचे शाप लाभणार....
कवितेच्या हस्ते तुला;
लिहायला बसशील वेगळंच कही....
सुचेल फक्त 'तीच' तुला!
कवितेच्या नावाखाली
नुसती शाई नासणार तू...
पानावरचं उठवणार वादळं
अन् पानावरंच शमवणार तू!
कायमंच हरलायस तू माझ्याशी..
खेळ जमलाच नाही तुला...
नशीबावर हवाला ठेवून
असे डाव लावू नयेत बाळा!
मग मी ही म्हणालो नशीबाला
मानलं साल्या तुला
चांगला खेळ मांडलास तू..
दोरे तुझ्या हातात
अन् माला उडायला सांगतोस तू!
तुझ्या लेखी हारलो असेनही
पण मझा हिशोब सरळ आहे...
गणितात मझ्या सगळा
वजाबाकीचाच तर खेळ आहे!
कसाही असला तरिही
माझा भोग माला मान्य आहे
सुंदर दिवसा साठी माला
उजाड रात्र मान्य आहे!
दुसर्या साठी झिजण्यास
खूप मोठं मन लागतं
चंदन आणि ज्योत होण्यास
माझ्यासारखं जिगर लागतं!
माझ्या वाटा वेगळ्या होत्या
माझे खेळच वेगळे होते..
दोरे होते तुझ्या हातात पण
माझे आकाशच वेगळे होते!
तिच्या सुखासाठी माझे दुःख
नेहमीच मान्य आहे मला
इथेच हरलास तू
अन् कळालंच नही तुला!!!
हे असलं कहितरी लिहीतो सध्या..
एकटाच स्वतःशी बोलतो सध्या...
अशीच कहितरी स्वप्न बघतो...
अन् सकळी स्वतःला हसतो सध्या!
सगळ्यांना हे हास्यच दिसणार आहे
चांगुलपणावरचा अढळ विश्वास दिसणार आहे
रत्री उश्या भिजजवत जागणारा मी फक्त
मझ्यापाशीच राहणार आहे!!!
फक्त मझ्यापाशीच राहणार आहे!!!
-रोहित गुजराथी

1 Comments:
Rohit..Farach apratim kavita ahet ya.. Khup diwsani parat wachlya aaj mi.. ani ajunach awadlya..
Lihina thambwu nakos..Uttam lihitos tu :)
Post a Comment
<< Home