Friday, October 20, 2006

आग
काल एक स्वप्न जळताना मी पाहिलं
ज्वाळेमध्ये होरपळेलं आयुष्य मी पाहिलं
गरिबीच्या गवतावर महागाईचं तेल होतं
बेकरीच्या मशालीला त्यावर पडताना मी पाहिलं...

नेत्याच्या पोतडीमधे सारी नुसती आश्वासनं होती
भाबड्या जनतेच्या विश्वासाची खुलेआम कत्तल होती
भ्रष्टाचाराच्या अनेक रूपाना हसताना मी पाहिलं
काल माणसानीच माणसाला आग लावलेलं मी पाहिलं...

प्रत्येकजण दुसय्रा कडे एक बोट दाखवत होता
स्वतःच्या अचरणाकडे सोईस्कर कानाडोळा होता
जबाबदारीचं सोईस्कर वर्गीकरण मी पाहिलं
चांगल्यांच्या चांगुलपणाचं पायपुसणं होताना मी पाहिलं...

प्रत्येक रात्री नंतर एक सुंदर पहाट आहे
हर एक काळ्या ढगाला एक सोनेरी किनार आहे...
पुस्तकालं सगळं आता पुस्तकातच रहिलं
मानवतेच्या चितेला मत्र धगधगताना मी पहिलं
काल माणसानीच माणसाला आग लावलेलं मी पाहिलं...

-रोहित गुजराथी

1 Comments:

Blogger Sukhada said...

Khupach chan!!!

10:44 AM  

Post a Comment

<< Home