kavita

Tuesday, January 27, 2009

मन व्याकुळ जाहले..

रात चढत राहिली...

तुझ्या माझ्यातले क्षण...

आठवत मोहरली!!!

एक एक क्षण असा...

जणू कळी बकुळीची..

रातभर मनभर..

उधळण सुगंधाची!!!

सारा सारा माझा देह...

साठवण स्पर्शांची...

जाते पेरत शहारे...

मिठी तुझिया भासांची!!!

रूप दुधाळले तुझे...

देह तारुण्याचे घाट...

रातभर चालू पाहे...

मन वळणांची वाट!!!


तुला पाहता आठवे

शुभ्र कळी निशीगंधी

साज लाजर्या रूपाचा

मनी अपार सुगंधी!!

मनी अपार सुगंधी!!!

Monday, August 11, 2008

रूप पहाता पहाता;
तुझे सूर्य ओशाळला...
पहा नभात नभात ;
अन चंद्रही पेटला...

Wednesday, April 16, 2008

कधीतरी ठेच लागायलाच हवी...
रक्तातून नजाकत वाहून जायला हवी...
सोन्यासारखा झळाळून निघशील तू...
थोडिशी धग सोसायलाच हवी!!!

रात्र कधितरी व्हायलाच हवी...
काळोखाची खोली कळायलाच हवी...
आंधारावरही मात करशील मग...
तेजाची तहान लागायला हवी!!!

माणूसकीची ऋणं फेडायला हवी...
जमा खर्चाची गणितं मांडायला हवी...
आयुष्याच्या संध्याकाळी समाधान उरेल मग..
मानवतेची कास धरायला हवी!!!

-रोहित गुजराथी

Tuesday, March 11, 2008

क्षण

एकच क्षण निर्णयाचा... ओळख आपली पटवूअन देतो....
'मी कोण' यक्ष प्रश्न... चुट्कीसरशी सोडवून जतो!!!

एकच क्षण मोहाचा... संस्कारांची खोली पहातो...
आईच्या विश्वासापुढे मग मोहाचाही विसर पडतो!!!

एकच क्षण सत्याचा... डोळे आपले उघडून जातो...
निर्दयी मानवतेची लक्तरे मनाच्या वेशीवर टांगून जातो....

एकच क्षण प्रेमाचा जगणे सुंदर करून टाकतो....
एकाच त्या क्षणी अन आयुष्य सार्थ ठरवून जातो...

Thursday, November 22, 2007

रात चांदण्यानं न्हाली...
तुझ्या डोळा उतरली...
नभी अंधार जाहला...
इथे पॉर्णिमा दाटली!!!

Friday, October 20, 2006

आग
काल एक स्वप्न जळताना मी पाहिलं
ज्वाळेमध्ये होरपळेलं आयुष्य मी पाहिलं
गरिबीच्या गवतावर महागाईचं तेल होतं
बेकरीच्या मशालीला त्यावर पडताना मी पाहिलं...

नेत्याच्या पोतडीमधे सारी नुसती आश्वासनं होती
भाबड्या जनतेच्या विश्वासाची खुलेआम कत्तल होती
भ्रष्टाचाराच्या अनेक रूपाना हसताना मी पाहिलं
काल माणसानीच माणसाला आग लावलेलं मी पाहिलं...

प्रत्येकजण दुसय्रा कडे एक बोट दाखवत होता
स्वतःच्या अचरणाकडे सोईस्कर कानाडोळा होता
जबाबदारीचं सोईस्कर वर्गीकरण मी पाहिलं
चांगल्यांच्या चांगुलपणाचं पायपुसणं होताना मी पाहिलं...

प्रत्येक रात्री नंतर एक सुंदर पहाट आहे
हर एक काळ्या ढगाला एक सोनेरी किनार आहे...
पुस्तकालं सगळं आता पुस्तकातच रहिलं
मानवतेच्या चितेला मत्र धगधगताना मी पहिलं
काल माणसानीच माणसाला आग लावलेलं मी पाहिलं...

-रोहित गुजराथी

Wednesday, October 18, 2006

माला पुन्हा college ला जायचंय..
नव्या लाटांवर स्वार होताना
जुन्या वाटांना जपून ठेवायचंय
माला पुन्हा college ला जायचंय..

नोकरी लागली,professional झालो,
corporateworld मधली entity झालो,
साला studentचे आम्ही emplyoee झालो..
थोडावेळ तरी हे transformation माला revert करायचंय...
माला पुन्हा college ला जायचंय..

इथे foodcourt आहे पण canteen नाही..
batch-owner आहे पण guide मात्र नाही..
चहा आहे पण cutting तेवढा नाही..
आहो चहा-parle-G लाही आता ती सर नाही..
साला सगळं आहे इथे पण काहीसुद्धा नाही...
हे सगळं माला परत मिळवायचंय...
माला पुन्हा college ला जायचंय..

मनं सगळ्यांची बंद आहेत अन्
म्हणे culture खूप open आहे..
दाखवायची खूप चांगली आहे अन्
खायची खूप वेगळी आहे...
निर्मळ मनाच्या मित्राला भेटायला;
माला पुन्हा college ला जायचंय..

table वाजवंत गाणी गायला- canteen ला जावं..
जिवभावाच्या मैत्रीचं मूळ, canteenच्या चहात रूजावं..
book-chat करण्यासाठी- lectureला बसावं..
एखाद्या दिवशी तेच chat वाचत- डोळ्यात पाणी येईतो हसावं...
submission enjoy करायला, practical असावं..
अन् nights मारून sheets काढून- शेवटच्या क्षणी submission करावं..
project च्या नावाखाली- तासंतास cricket खेळवं..
कुठलंही planning न करता- सिंहगडला, महाबळेश्वरला जावं
असं मनसोक्त, बेबंद आयुष्य- रोज जगावं..
कविता लिहिताना मग्न होउन-boat-club वर बसून रहावं..
अन् अता तसं लिहीता न येण्यामागे- त्य पाराचं नसणं असावं...
event organise करायला, दिवस रात्रं झतावं..
अन् eventच्या शेवटच्य दिवशी- डोळ्यातून eventचं यश पाझरावं...
gatheringची धुंदी अनुभवायला- एखाद्या committeeत काम करावं..
अख्खं gatheringच मग- घरचं कार्य होउन जावं....f
arewellच्या दिवशी मग- college मध्ये घुटमळंत रहावं...
घरी निघल्यावर मग- कहितरी मागे रहिल्यासारखं वाटावं....
ते मागे रहिलेलं शोधायला...
या सगळ्यांशी निःशब्द संवाद साधायला...
त्यातलं आकंठ समाधान अनुभवायला...
माला पुन्हा college ला जायचंय..
माला पुन्हा college ला जायचंय..