kavita

Wednesday, April 16, 2008

कधीतरी ठेच लागायलाच हवी...
रक्तातून नजाकत वाहून जायला हवी...
सोन्यासारखा झळाळून निघशील तू...
थोडिशी धग सोसायलाच हवी!!!

रात्र कधितरी व्हायलाच हवी...
काळोखाची खोली कळायलाच हवी...
आंधारावरही मात करशील मग...
तेजाची तहान लागायला हवी!!!

माणूसकीची ऋणं फेडायला हवी...
जमा खर्चाची गणितं मांडायला हवी...
आयुष्याच्या संध्याकाळी समाधान उरेल मग..
मानवतेची कास धरायला हवी!!!

-रोहित गुजराथी